विशालजी सकट, यांनी व्यक्त केलेले मनोगत
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीतून राज्याच्या 13 व्या विधानसभेत सर्वात युवा “आमदार” म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ पटलावर कोरल गेलेलं नाव.
आपल्याच तालुक्यातील मतदारांनी स्वीकारलेले परंतु आम्ही ठराविक यंत्रणे सोबत असल्याने कट्टर विरोधक. विरोधासाठी परिसीमा गाठणारे आम्ही आणि समोर आले तरी नमस्कार करणारे राहुलदादा.
मागील काही महिन्यांपासून ठराविक यंत्रने पासून थोड दूर आहे. विचार केला की एवढी कटुता आपण का पाळत आहोत ? मग ठरवलं आणि भेटलो.
खूप विस्तृत आणि राजकीय सामजिक चर्चा झाली. विशेष करून दूध व्यवसाय, कारखानदारी, राजकारणा मध्ये आपण फार ज्ञान आत्मसात केले आहे. “अक्टीव्ह पॉलिटिक्स” मध्ये व्यवसायाकडे दुर्लक्ष होते. परंतु आपण सर्व व्यवसाय कारखानदारी व राजकारणाची सांगड घालून उत्कृष्ट पायंडा निर्माण केला आहे. युवक म्हणून ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे.
आपल्या भेटी पूर्वी एक प्रश्न मनात होता की पितृछत्र हरपल्या नंतर आपण तात्यांचा वारसा कसा पुढे नेणार? कारण राजकीय विरोधक असणाऱ्या लोकांशी भेटणे, सुख दुःखाच्या निमित्ताने मुद्दामहून लोकांत जाणे हे तात्यांचे गुण. सभापती असताना तात्यांची शासकीय पकड सर्वश्रुत आहे. परंतु अल्पावधीतच आपणही कार्यकारी प्रशासन यंत्रणेवर अंकुश ठेवण्याची जुजबी कला आणि ती सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी कशी वापरायची हे ही शिकून घेतलात.
त्याबरोबर सर्वकाळ राजकारण डोक्यात न ठेवता ज्येष्ठांचा आदर, सर्वांन बरोबर मैत्री पूर्ण संबंध, जुन्या नव्यांचा मेळ बसविणे ही आपली परिपोक्त बाजू आहे. तसे फार कमी वयात आमदारकी मिळून ही आपण सर्व तत्कालीन मंत्री मंडळात चांगली ओळख निर्माण केली.
वर्षा बंगला व सह्याद्री अतिथी गृह या ठिकाणी आपला प्रत्यक्ष सामना झाला होता. चंद्रकांत दादा यांचेशी तुम्ही बंगल्यावर भेटत.महाजन साहेब यांचे निवासस्थानी देखील आमच्या पूर्वी तुम्ही येवून गेलेले असत.
अधिवेशनात वेल मध्ये उतरून मोठ्या मोठ्याने घोषणा देत असताना, विधानभवनाच्या प्रवेशद्वारा वर ठिया देत असताना आपणास पाहिले आहे. तुमच्या अनेक गोष्टीची माहिती भेटत होती. सर्वपक्षीय आमदार खासदार यांचेशी आपले कौटुंबिक सबंध निर्माण करण्यात आपण यशस्वी झालात. आपण गत विधान सभेत थांबण्याच कारण सांगितले कदाचित ते बरोबर असेलही परंतु तरीदेखील पक्षासाठी अण्णांचा प्रचार देखील मन लावून केला हे वाखण्या जोगे आहेच.
कुठलीही राजकीय अट न ठेवता येणाऱ्या प्रत्येकाचं काम मार्गी लावण्याचा तुमचा प्रयत्न अनेकांचं मन जिंकणारा आहे. तुमच्या कोण्या कार्यकर्त्या वर बर्डन नसून तो स्वखुशीने तुमच्या जवळ असणे तुमच्यातील नेतृत्व गुणाची किनार आहे. यापूर्वी अनेकदा आपणावर कडाडून पातळी सोडून टीका केली. तरीही आपण सर्वगोष्टी अगदी सहज सोडून दिल्या. कट्टरता कामाची नाही हे आपण दाखवून दिले.
आजवर जहरी टीकाच केली परंतु राजकीय जोडे बाजूला सारून तुमच्यातील चांगल्या बाजू पुढे आणणे याच उत्कृष्ठ शुभेच्छा असतील. भविष्यातील राजकीय समीकरण तुमच्या अवती भोवती फिरणार तुम्ही केंद्रबिंदू असणार हे नक्की. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
ज्या माणसाला कुठे थांबायचं आणि कुठे चालायचं ते समजतं तो सगळ्यात पुढे असतो. राहुल दादा तसा आमचा तुमच्याशी संबंध फार उशिरा आला, पण तुमच्या नेतृत्वगुणात लपलेली उदारता मनाला स्पर्शून गेली. वडिलांचं ऐकता आले त्यांना समजून घेता आले म्हणून तुमची वाटचाल सुकर आहे. नेता होण्यापेक्षा मित्र होण्याला तुमचं प्राधान्य असल्याने तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.
येणाऱ्या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व निर्विवादच राहील याबद्दल तसूभरही शंका नाही. आपणास जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
विशालजी सकट, श्रीगोंदा
8605091111